ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी

   तांदूळवाडी – उच्छावली ग्रामपंचायत, मुकाम तांदूळवाडी, पोस्ट सफाळे, तालुका पालघर हे गाव पालघर तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १८–२० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत तांदूळवाडी व उच्छावली ही गावे येतात.
गावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ८७० हेक्टर असून ते प्रामुख्याने डोंगराळ, ऐतिहासिक व नैसर्गिक स्वरूपाचे आहे.
गावात एकूण ४८९ कुटुंबे वास्तव्यास असून २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २१२३ आहे. त्यामध्ये १०४९ पुरुष व १०७४ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने तांदूळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी, डोंगराळ व वनक्षेत्रीय प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. शेती (भातशेती) व मजुरी हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात.
गावाला रस्ते वाहतुकीची सुविधा उपलब्ध असून सार्वजनिक (एस.टी.) व खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच सफाळे रेल्वे स्टेशन सुमारे ८-९ कि.मी. अंतरावर आहे.
हवामानाच्या दृष्टीने, उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३२–३५°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात तापमान तुलनेने सौम्य व आल्हाददायक राहते. पावसाळ्यात या भागात भरपूर प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, ज्यावर येथील भातशेती आणि अळंबीसारख्या नैसर्गिक रानभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२,१२३
पुरुष लोकसंख्या
१,०४९
महिला लोकसंख्या
१,०७४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३४९
अनुसूचित जाती (SC %)
०%
अनुसूचित जमाती (ST %)
९६.६०%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय   
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center) 

 

 
अंगणवाडी 

 

 
प्राथमिक शाळा   
माध्यमिक शाळा   
उच्च माध्यमिक शाळा   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमी   
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :